उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी नव्हे तर मराठी सिनेमेसुद्धा बनवू ; उद्धव ठाकरेंना ‘आव्हान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेच्या पहिल्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फिल्मसिटी तिकडे नेऊन दाखवा, असे खुले आव्हान दिले होते.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या आणि कंगना हा वाद विकोपाला गेला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून (बॉलिवूड) दुसरीकडे नेऊन दाखवा असे आव्हान केलं होतं. या प्रकरणाला उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेचे राजू श्रीवास्तव यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

”योगी आदित्यनाथ यांनी एखादे काम मनावर घेतले तर ते पूर्ण करतात ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. हे कदाचित उद्धव ठाकरे यांना माहीत नसावं,. बॉलिवूड ही काही वस्तू नाही जे कोणी इकडे तिकडे उचूलन ठेऊ शकेल. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीसाठी ग्रेटर नोएडा मध्ये जागा घेण्यात आली आहे,” असे उत्तर प्रदेश च्या फिल्म विकास परिषदेचे राजू श्रीवास्तव म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ”लोकांना रोजगार मिळावा हा देखील उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी बनविण्यामागचा हेतू आहे. चांगल्या सुविधा देऊन हिंदी, इंग्रजीबरोबर मराठी चित्रपटांची निर्मिती देखली इथे होईल.”

बरयाचदा वेब सीरिजला चांगला विषय मिळत नाही. परिणामी वेब सीरिजमध्ये अश्लील आणि शिवीगाळ हेच प्रेक्षकांसमोर येत. याला आम्ही विरोध करतो. आम्ही अशा विषयांना टाळतो. त्यांनी विषय चांगल्या पद्धतीचे निवडले, तर आम्ही त्यांना सबसिडी देण्याचा विचार करू. तसंच यूपीमध्ये आता अभिनेते आणि अभिनेत्री यांना सबसिडी मिळू लागली आहे. यूपीमध्ये आता अभिनेते आणि अभिनेत्री यांना दम दाखवण्याचा प्रकारे घडतात. मुंबईच्या तुलनेत सिनेमे बनविण्याचे खर्च देखील कमी आहे. प्रत्येक जिल्यात आता सिग्नल विंडो सिस्टिम सुरू करण्यात आली आहे.
असे श्रीवास्तव यावेळी म्हणाले.