मंदिरात एकाच वेळी 2 मुलींशी लग्न, एकीला घेऊन झाला नवरदेव ‘फरार’, बलात्काराचा FIR दाखल

प्रयागराज : वृत्तसंस्था – एका तरूणाने सोमवारी दोन मुलींशी मंदिरात लग्न केले. एका दिवसानंतरच या तरूणाने दोघींपैकी एकीला सोडून दिले आणि दुसरीसोबत पळून गेला. पतीच्या या कृत्यामुळे हैरान झालेल्या दुसर्‍या मुलीने शुक्रवारी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा खळबळजनक प्रकार उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील आहे.

सोमवारी हा तरूण आपल्या नव्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी मंदिरात पोहचला असता तेथे त्याची जुनी प्रेयसीसुद्धा पोहचली. यावरून जेव्हा गोंधळ सुरू झाला तेव्हा तरूणाने दोघींच्या भांगात कुंकू भरून दोघींशी लग्न केले. या आगळ्यावेगळ्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. हा तरूण एका मुलीवर प्रेम करत होता आणि लग्नापूर्वी त्याच्या प्रेयसीने त्याला धमकावले होते की, जर त्याने लग्न केले नाही तर ती विष पिऊन आत्महत्या करेल. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले असता त्याने मुलीच्या गालात थप्पड मारली. मुलीने या मारहाणीची तक्रार पोलीसात केली.

या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी तरूणाला अटकसुद्धा केली होती. हा तरूण आपल्याच परिसरातील एका मुलीसोबत अगोदरपासूनच प्रेम करत होता. अनेक वर्षापासून त्याची ही प्रेमकथा सुरू होती. त्यानंतर सोमवारी तरूण नव्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी मंदिरात पोहचला असता जुनी प्रेयसीसुद्धा तेथे पोहचली, आणि तेथे जोरदार गोंधळ सुरू झाला. यानंतर घराच्या जवळच एका मंदिरात सर्वांसमोर तरूणाने आपल्या दोन्ही प्रेयसींशी एकाच वेळी त्यांच्या भांगात कुंकू भरून आणि मंगळसूत्र घालून लग्न केले. लग्नासाठी उपस्थित लोकांनी या लग्नाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर वायरल केला होता. त्यानंतर तरूणाने दोघींसोबत हनीमून साजरा केला आणि एकीसोबत फरार झाला. यामुळे हैरान झालेल्या मुलीने आपल्या पतीचा चार दिवस शोध घेतला आणि नंतर शुक्रवारी कर्नलगंज पोलीस ठाण्यात पतीच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.