नाशिकचे शहिद निनाद मांडवगणे यांना ‘मरणोत्तर वायू सेना शौर्य पदक’ जाहीर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकचे स्क्वाड्रन लिडर शहिद निनाद मांडवगणे यांना मरणोत्तर वायू सेना शौर्य पदक जाहीर करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या भारत-पाक सीमेवर सुरु असणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ हेलिकाॅप्टरद्वारे सीमेवर टेहाळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय 33) यांना वीरमरण आलं होतं.

काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एमआय- 17 हे हेलिकॉप्टर भारत-पाक सीमेवर सुरु असणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत टेहाळणी करत होतं. यावेळी हे विमान कोसळून या दुर्घटनेत नाशिकचे स्क्वाड्रन लिडर निनाद मांडवगणे यांना कर्तव्य बजवाताना वीरमरण आलं. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निनाद मांडवगणे यांच्यासह 7 जण शहिद झाले होते. 27 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. नाशिकच्या अमरधामनजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

आपलं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आल्यानं निनाद मांडवगणे यांना आता मरणोत्तर वायू सेना शौर्य पदक सरकारनं जाहीर केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like