‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये WhatsApp वरून मटका, पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात लॉकडाऊन काळात व्हाट्सअपवर मटका घेणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिसांनी ताडीवाला भागात ही कारवाई केली आहे.
प्रीतम उत्तरेश्वर गांधले (वय ३५ रा. ताडीवाला रस्ता ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ताडीवाला रस्ता परिसरातील नवचैतन्य मित्र मंडळाजवळ एकजण मोबाईल फोनवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मटका घेत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल काळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याची माहिती खातरजमा केली. त्यानंतर सापळा रचून त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी प्रीतम ऑनलाईनरित्या मटका घेत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून १२ हजार रुपये किंमतीचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल काळे, कर्मचारी लाड, जगताप, सावंत, घोडेकर यांच्या पथकाने केली.