पुणे पोलीस आयुक्तालयात मोहल्ला कमिटी आणि शांतता कमिटीची बैठक संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्तालयामधील 30 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहल्ला कमिटी आणि शांतता कमिटीची बैठक झाली. पोलीस वर्धापन दिन (रेझींग डे सप्ताह) उद्घाटन कार्यक्रमानिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रेझींग डे सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

यावेळी झालेल्या मोहल्ला कमिटी आणि शांतता कमिटीच्या बैठकिला पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक प्रशासन, विशेष बाल पथक व समन्वय अधिकारी कम्युनिटी पोलिसींग शिल्पा चव्हाण यांच्यासह मोहल्ला कमिटीचे आणि शांतता कमिटीचे 131 सदस्य उपस्थित होते. तसेच 30 पोलीस ठाण्यातील 39 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे म्हणाले, चांगला विचार कधीच जुना होत नाही. त्यामध्ये सुधारणा होते. तर शांतता समितीच्या सदस्या अल्पना देशमुख यांनी नागरिकांकरीता Comfort Zone तयार करण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच 2019 मध्ये पुणे आयुक्तालयामार्फत राबविण्यात आलेल्या योजना नवीन वर्षामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्याबाबत तसेच काही चुका असल्यास त्यात सुधारणा करण्याचे आश्वसन दिले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/