‘कोरोना’ काळात अशी होणार रामलीला, मनोज तिवारी बनणार ‘अंगद’ तर ‘भरत’च्या रोलमध्ये असतील रवि किशन

अयोध्या : या रामलीलामध्ये मुख्य भूमिकेत खासदार आणि फिल्म स्टार मनोज तिवारी अंगदची भूमिका करतील आणि खासदार फिल्म स्टार रवि किशन भरतच्या भूमिकेत दिसतील. फिल्मस्टार विन्दु दारा सिंह हनुमानाच्या रूपात आणि आसरानी नारदांचा रोल प्ले करताना दिसणार आहेत.

कोरोना काळात प्रत्येक सणाचा रंग कमी झाला आहे. मोकळ्या हवेत श्वास घेणे सुद्धा मनुष्याला अवघड होऊन बसले आहे. परंतु, हळुहळु देश पुढे सरकत आहे. सध्या रामलीलाच्या मंचनची तयारी सुरू आहे.

रविवारी अयोध्याच्या रामलीला कमेटीच्या पदाधिकार्‍यांची दिल्लीत बैठक झाली, यामध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रवेश वर्मा प्रमुख होते. ते म्हणाले, या रामलीलाचे मंचन सर्वात सुंदर असेल.

रामलीलामध्ये मुख्य भूमिकेत मनोज तिवारी अंगदच्या तर फिल्म स्टार रवि किशन भरतच्या भूमिकेत दिसतील. विन्दु दारा सिंह हनुमान, असरानी नारद मुनी, रज़ा मुराद अहिरावण, शाहबाज खान रावणाच्या रूपात दिसतील आणि अनेक मोठे स्टार जसे की अवतार गिल आणि राजेश पुरी सुद्धा महत्वाचे रोल करताना दिसणार आहेत.

पाहण्यासारखी असेल अ‍ॅक्शन
यावेळी चेयरमन राकेश बिंदल यांनी म्हटले की, या रामलीलाची अ‍ॅक्शन पाहण्यासारखी असणार आहे. हवेत उडणारे हनुमानजी आणि हवेत राम आणि रावणाचे युद्धा होईल. यामध्ये अनेक ÷अद्भुत अ‍ॅक्शन पहाण्यास मिळतील.

या रामलीलाचे कॉस्च्युम खुपच आकर्षक असतील. व्हाईस चेयरमन वी. पी. टंडन म्हणाले की, रामलीलाचा उद्देश हाच आहे की, लोक आपल्या घरी टीव्हीवर किंवा फोनवर 17 ऑक्टोबरपासून 25 ऑक्टोबरपर्यंत प्रभू श्रीरामांच्या रामलीलेचा आनंद घेतील.