‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ ! पर्यटकानं ‘फीड बॅक’ फॉर्मवर लिहीलं

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या काळात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असा उल्लेख केला होता. त्यांचं हे वाक्य आणि त्यांचा व्हिडीओ सोशलवर खूप गाजला. हे वाक्य समोर दिसलं की, देवेंद्र फडणवीसांची आठवण आल्याशिवाय रहात नाही अजूनही या वाक्याची चर्चा सुरूच आहे. नुकतंच भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यात भ्रमंतीसाठी आलेल्या एका पर्यटकानं फीडबॅक फॉर्मवर अनोख्या पद्धतीनं फीडबॅक दिला आहे. ज्यामुळं फडणवीसांची आठवण होते. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं त्यानं फीडबॅक देताना म्हटलं आहे. सध्या त्याच्या या फीडबॅकची चर्चा सुरू आहे. त्याच्या फीडबॅकचा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

Mi Punha Yein

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोका अभयारण्याचा समावेश आहे. यात वाघ, अस्वल, बिबट्या, नीलगाय, हरिण या वन्य प्राण्यांसह 200 प्रकारचे पक्षी, 50 प्रकारची फुलपाखरे, एक हजार प्रकारच्या वनस्पती आहेत. अजनी हमेशा, राजडोह तलाव या ठिकाणी बारमाही पाणी असते. त्यामुळे तेथे वन्य प्राण्यांचे हमखास दर्शन होते. परंतु जास्त करून हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळते.

इथे येणाऱ्या पर्यटकांकडून फीडबॅक फॉर्म भरून मागितला जातो. भंडारा जिल्ह्यातील दीपक साखरकर या पर्यटकानं फीडबॅक फॉर्म भरताना आणि आपला अभिप्राय देताना सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यात निसर्ग मार्गदर्शकाचे वन्यजीव, जंगलाचे ज्ञान, जागरूकता, एकंदर स्वभाव आणि वागणूक कशी वाटली याचा समावेश होता. अभयारण्यात आलेले अनुभव आणि अमूल्य सूचनेच्या रकान्यात साखरकर यांनी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं तीनदा नमूद केलं.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like