21 जूनपासून उघडणार मक्का शहरातील मशिदी, नमाज पठण करणार्‍यांना पालन करावे लागतील ‘हे’ नियम

रियाद : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना संकटामुळे तीन महीन्यांपासून बंद असलेले पवित्र शहर मक्का उद्या म्हणजे रविवारी पुन्हा एकदा उघडणार आहे. गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, यादरम्यान लोकांना शहरात आरोग्यासंबंधीचे नियम पाळावे लागणार आहेत. मागील महिन्याच्या अखेरीस पूर्ण सौदी अरबमध्ये मशिदी पुन्हा उघडल्या आहेत, परंतु मक्का शहरातील मशिदी बंद होत्या. रविवारी मक्कामध्ये सुमारे 1,560 मशिदी फजरच्या नमाजच्या वेळी उघडतील.

मक्कामध्ये इस्लामिक प्रकरणांच्या मंत्रालयाच्या शाखेने शहरातील मशिदींना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आदेशात म्हटले आहे की, लोकांनी नमाज अदा करण्यासाठी आपली चटई आणावी आणि नमाजच्या वेळी शारीरीक अंतराचे पालन करावे. मंत्रालयाने लॉकडाऊनदरम्यान सर्व मशिदींची स्वच्छता करण्याचे जबाबदारी एजन्सीला दिली होती. स्वयंसेवकांनी सुद्धा मक्कामधील मशिदींमध्ये उपाययोजना करण्यासाठी काम केले आहे.

स्वयंसेवकांनी नमाज अदा करतेवेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे संकेत देणारे स्टीकर लावले आहेत. सौदी अरबमध्ये आतापर्यंत संसर्गामुळे 1,184 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,50,292 प्रकरणे समोर आली आहेत. यादरम्यान संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांनी म्हटले की, कोरोनाने संपूर्ण जगात जीनजीवन विस्कळीत केले आहे. लोकांमध्ये एकाकीपणामुळे व्यस्तता वाढली आहे. यासाठी योग करणे खुप गरजेचे आहे.

कोरोना संकटात यावर्षी 21 जूनरोजी अंतरराष्ट्रीय योग दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. महासभेचे अध्यक्ष तिजानी मोहम्मद बंदे यांनी आपल्या डिजिटल संदेशात म्हटले की, कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकटेपणा वाढला आहे, आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. लोक आपल्या आणि जवळच्या लोकांच्या आरोग्याबाबत चिंतेत आहेत.