दारूसाठी बापानं 3 महिन्यांच्या बाळाचा केला 22 हजारांमध्ये सौदा, मात्र…

हैदराबाद : वृत्तसंस्था – दारूसाठी हैदराबाद येथील प्रवासी मजूर मदन कुमार सिंहने शेजार्‍याला 2 महिन्यांचे बाळ विकले होते. मात्रा, पोलिसांना माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली. ही घटना 23 मे रोजी घडली. सध्या मूल शिशु विहारमध्ये आहे, अद्याप बाळाला आईकडे सोपवण्यात आलेले नाही .
मदनच्या शेजारी राहणार्‍या सेशुच्या बहिणीला मूल नव्हते. जेव्हा त्यांना कळले की मदनला मुलगा झाला आहे, तेव्हा त्यांनी दत्तक देण्याची विचारणा केला. मदनही बाळ दत्तक देण्यासाठी तयार झाला. जेव्हा तो बाळ सोपवण्यासाठी पोहचला तेव्हा त्याने 50 हजारांची मागणी केली.

अखेर त्यांनी बाळाचा 20 हजार रुपयांचा सौदा केला. मदनच्या शेजारी राहणार्‍या देवीकडे बाळाला विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी 22 हजारांचे कर्ज घेत बाळ विकत घेतले. यासंदर्भात मदनची पत्नी सरिताने पोलिसांना सांगितले की, तिच्या नवर्‍याने न सांगताच बाळाचा सौदा केला. जेव्हा तिला कळले तेव्हा तिने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांत तक्रार केली. सरिताने तिचा नवरा दारू पिण्यात सगळे पैसे घालवतो, त्यामुळे दोन वेळच्या जेवणासाठी घरात पैसे नसल्याचेही पोलिसांना सांगितले.