‘कोरोना’मुळं मरण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढून मरू, स्वाभिमानीनं दिला ‘हा’ गंभीर इशारा

नगर  : पोलीसनामा ऑनलाइन  –   सध्या कोरोना काळात सरकारने अनेक बाबी अद्याप सुरू केलेल्या नाहीत. यामुळे सरकारने हातावर पोट असणार्‍यांसाठी अद्याप काहीही केलेले नाही. त्यामुळे असे लोक उपासमारीने मरतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे याविरूध्द कोरोनामुळे मरण्यापेक्षा रस्त्यावरून लढून मरू, अशी भूमिका स्वाभिमानी संघटनेने दूध प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या गुरूवारी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे.

हा मोर्चा शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार्‍या आहे. तसेच या मोर्चामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळण्याचा इशाराचा संघटनेने दिलाय. संघटनेने तसे निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर नवीन पेच निर्माण झालाय.

‘आमचा दुधाचा धंदा मोडकळीस निघणार असेल तर, आम्ही रस्त्यावर येणार आहे. आम्ही करोनाचा विचार करणार नाही. करोना होऊन मरण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर लढून मरू. पण, आम्ही या आंदोलनातून आता माघार घेणार नाही,’ असेही संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी या आंदोलनाबद्दल सांगितले आहे.

केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरीत रद्द करावा. 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा. तसेच निर्यात अनुदान प्रती किलो 30 रुपये देण्यात यावे, दूध पावडर, तूप, बटर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावे. शेतकर्‍याच्या थेट खात्यावर 5 रुपये प्रतिलीटर अनुदान जमा करावे, यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या गुरुवारी (20 ऑगस्ट ) मोर्चा काढण्यात येणार आहे.

दुपारी एक वाजता नगरच्या स्टेट बँक चौकातून हा मोर्चा निघणार आहे. यामध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहे, असे संघटनेच्या वतीने सांगितले आहे. मात्र, हा मोर्चा काढताना लॉकडाऊनचे, कंटेनमेंट झोन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार नाहीत, असे संघटनेने स्पष्ट करून त्याबाबतचे निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे करोना अनुषंगाने असणार्‍या नियमांचे पालन न करता मोर्चा काढण्याचे संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर आता नवीन पेच निर्माण झालाय.

गुरुवारी काढण्यात येणार्‍या मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब मोरे यांनी दूध प्रश्नावर आंदोलन करणार्‍या भाजप नेत्यांवरही सडकून टीका केली.

यावेळी मोरे म्हणाले, ‘भाजपची भूमिका नाटकी असून दोन वर्षापूर्वी राज्यात भाजपचे सरकार होते.

पुणतांबा येथे मोठा संप झाला होता. पण, भाजपने रात्री तीन वाजता दरोडेखोरांसारखी बैठक लावली. तो संप मोडून काढण्याचे महापाप केले आहे. त्यात सदाभाऊ खोत होते. भाजपचे आजचे आंदोलन हे राजकीय द्वेषापोटी असून तो केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप करताना शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न होते. ते भाजपने सत्तेत असताना का मार्गी लावले नाहीत?, असा प्रश्नही मोरे यांनी यावेळी उपस्थित केला.