‘लक्झरी’ बसमध्ये 15 वर्षाच्या मुलीचे ‘हात-पाय’ बांधून ड्रायव्हरनं तोंडात कोंबला ‘बोळा’, क्लिनरनं केला ‘रेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरच्यांवर नाराज होऊन 15 वर्षांची एक मुलगी आपल्या भावाकडे जाण्यासाठी निघाली आणि रस्त्यात मधेच गायब झाली. पोलिसांनी तपास केला त्यावेळी धक्कादायक माहितीसमोर आली. बस स्टॅण्डवर एका बसमध्ये काही लोकांच्या समोर रात्रीच्या दोन वाजता मुलीवर बलात्कार करण्यात आला, पोलिसांनी कारवाई करत आरोपीना अटक केली आहे. मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार आहे.

अकेली नाबालिग से बस में रेप, ड्राइवर ने हाथ-पैर बांधे-दूसरा देखता रहा

राजगढ जिल्ह्याच्या सुठालिया येथे राहणारी एक नाबालिक मुलगी गायब झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सुठालिया पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार मुलगी बुधवारी एकटी आपल्या भावाकडे इंदोरला चालली होती.सुठालिया पासून ब्यावरा येथे जात असताना बस क्लीनर राजू अहिरवार (22) याने मुलीकडून मोबाइल हिसकावून घेत नंबर घेतला आणि स्वतःच्या फोनमध्ये सेव केला.

अकेली नाबालिग से बस में रेप, ड्राइवर ने हाथ-पैर बांधे-दूसरा देखता रहा

जेव्हा मुलगी इंदोरवरून परतत होती आणि ब्यावरा बस स्टॅन्डवर होती त्यावेळी आरोपीच्या एका मित्राने तिला फोन करून तुझे आई वडील या ठिकाणी येत असल्याचे सांगितले आणि मुलीला बसमध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. बस चालकाने मुलीचे हात पाय बांधले आणि तिच्या तोंडात कपडा कोंबला आणि तिच्यावर क्लिनरने अत्याचार केला. बस चालक कादर खान आणि इतर अजून एक व्यक्ती केवळ तमाशा पाहत राहिले.

अकेली नाबालिग से बस में रेप, ड्राइवर ने हाथ-पैर बांधे-दूसरा देखता रहा

मुलीने रात्री उशिरा स्थानिक पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 363, 366, 376 (2) आय 3/4 पॉक्सो एक्टनुसार कारवाई करत तक्रार दाखल केली . यावेळी मुलीने चालकाचे नाव देखील सांगितले होते परंतु तूर्तास पोलिसांनी एकच आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती मात्र नंतर पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/