‘तिनं’ चुलत भाच्याला घरात आसरा दिला, ‘त्यानं’ तिच्या अल्पवयीन मुलीचं ‘पोट’चं वाढवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरीनिमित्त पुण्यात आलेल्या चुलत भाच्याला आपल्या घरी तिने आसरा दिला. पण त्याने तिच्याच अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकंरणी हिंजवडी पोलिसांनी विकास लिंगराज भोसले (वय २०, रा. मगरवाडी, जि़ लातूर) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. विकास याला नोव्हेंबर २०१८ मध्ये पुण्यात नोकरी लागली. त्यामुळे त्याला या महिलेने आपल्या घरी आसरा दिला. त्या कामाच्या ठिकाणी दिवसपाळी, रात्रपाळी असते. घरात त्यांची १७ वर्षाची मुलगी व तिचा १३ वर्षाचा भाऊ आणि विकास हे तिघे असत.

दरम्यान, त्यांच्या मुलीला चक्कर येत असल्याने या महिलेने तिला डॉक्टरांकडे नेले. त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितले. परंतु, त्यांच्याकडे पैसे नसल्याने सोनोग्राफी करता आली नाही. याबाबत त्यांनी मुलीला विचारल्यावर तिने तु रात्रपाळीला गेल्यावर विकास मला आपण लग्न करु. मी तुला सुखात ठेवेन असे सांगून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या फिर्यादीवरुन पोलिसांनी विकास भोसले याला अटक केली आहे.

Visit : Policenama.com