गायक ‘पंडित जसराज’ यांच्या नावावर छोटा ग्रह, असा सन्मान मिळालेले पाहिले भारतीय कलाकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या शास्त्रीय गायनाने सर्वांच्या मनावर छाप सोडणाऱ्या पंडित जसराज यांचा आणखी एक गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्यांचे नाव संपूर्ण ब्रह्मांडात होणार आहे. इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल यूनियन म्हणजेच आयएयूने मंगळ आणि गुरूच्या मध्ये असलेल्या एका छोट्या ग्रहाला पंडित जसराज यांचे नाव दिले आहे. हा सन्मान मिळणारे ते पहिले भारतीय आहे.

या छोट्या ग्रहाचा शोध 11 नोव्हेंबर 2006 लागला असून सध्या याचे नाव  2006 वीपी 32 असे ठेवण्यात आले आहे. हा ग्रह सध्या मंगळ आणि गुरूच्या मध्ये भ्रमण करत आहे. हे मायनर प्लॅनेट ग्रह देखील नसतात आणि यांना धूमकेतू देखील म्हणता येत नाही. पंडित जसराज यांची मुलगी  दुर्गा जसराज यांनी या संबंधी माहिती दिली. 23 सप्टेंबर रोजी या संस्थेने याची घोषणा केली. संपूर्णपणे संगीतासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या जसराज यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. या सन्मानाविषयी बोलताना जसराज म्हणाले कि, यामध्ये देवाची मोठ्या प्रमाणात कृपा आहे. हा पुरस्कार म्हणजे भारत आणि भारतीय संगीतासाठी देवाचा आशीर्वाद आहे.

दरम्यान, याआधी जागतिक स्तरावरील हा सन्मान मिळवणाऱ्या संगीतकार मोजार्ट, बीथोवन आणि टेनर लूसियानो पावरोत्ति यांच्यानंतर पंडित जसराज हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत. या ग्रहाचा क्रमांक हा 28 जानेवारी 1930 या  जसराज यांच्या जन्मतारखेच्या क्रमांकाच्या उलटा ठेवण्यात आला आहे.

Visit : Policenama.com