एका सेकंदाने दिली मृत्यूला हुलकावणी, पहा व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : नशीब जोरावर असल्यास काहीही घडू शकते. असाच प्रकार केरळमध्ये घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून चालत असलेल्या तरुणाच्या अगदी जवळून टेम्पो गेला, मात्र त्या व्यक्तीला काही झाले नाही. चावरा थट्टाशीरी येथील विजयपालास येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा व्हिडीओ कैद झाला. राष्ट्रीय महामार्गावरील विजयपालस येथे ही घटना घडली आहे.

http://https://www.facebook.com/watch/?v=600262100689928&extid=DwArB0mXfMpEtFZ5

रस्त्याच्या कडेने जात असलेल्या युवकाच्या दिशेने एक व्यक्ती चालत होती. त्याच्या मागून व्हॅन आणि एक लॉरी दुसर्‍या दिशेने येत होती. मागून येणार्‍या मिनी व्हॅनचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या व्यक्तीच्या जवळून गेली. मात्र या व्यक्तीला खरचटलेही नाही, आणि व्हॅन जवळ असलेल्या झाडावरून जाऊन आदळली. बाजूने गेलेली व्हॅन पाहून रस्त्याच्या कडेने चालत असलेली ही व्यक्ती घाबरली, आणि पळू लागली.

या सगळ्या घटनेचा व्हिडीओ रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. चमत्कारीकरित्या या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर चवरा पोलिसांनी व्हॅन चालकाची चौकशी केली. त्याच्यावर अद्याप दाखल करण्यात आला नाही आहे. मात्र गाडी चालवताना त्याला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.