ज्या चेहर्‍यांना पाहून लोक तोंड ‘वेढं-वाकडं’ करतात, त्यांनाच ‘मिठी’ मारली मिस युनिव्हर्स UK नं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे चेहरे पाहून लोकं तोंड वळवत असतात त्याच चेहऱ्यांसाठी फार महत्वाचे काम मिस युनिव्हर्स करत असून तिने त्यांच्याबरोबर खूप वेळ देखील व्यथित केला. मिस यूनिवर्स ग्रेट ब्रिटेन एमा जेनकिंस हिने ऍसिड पीडित मुलींबरोबर वेळ घालवला आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली.

एमा जेनकिंस हिने केवळ या पीडितांबरोबर चर्चा केली नसून त्यांच्याबरोबर फोटो देखील काढले. त्यावेळी मिस यूनिवर्सला आपल्यामध्ये पाहून या मुली भारावून गेल्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या स्वागताबद्दल तिने त्यांचे आभार मानले असून अशाप्रकारच्या घटनांना आवर घालणे गरजेचे असल्याचे बोलताना तिने म्हटले. त्याचबरोबर महिलांसाठी हा खूप अवघड क्षण असल्याचे देखील तिने म्हटले आहे. याचबरोबर तिने दिल्लीतील प्रदूषणाविषयी देखील चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांना जास्तीतजास्त झाडे लावण्याची देखील तिने विनंती केली आहे.

दरम्यान, त्यानंतर संध्याकाळी तिने ताजमहालाला भेट दिली. त्यावेळी तिला खूप आनंद झाला होता. यावेळी ती आपल्या आग्रा दौऱ्यावर खूपच खुश दिसत होती.

Visit : Policenama.com