नातवासह मळ्यात गेलेले आजोबा परतलेच नाहीत, शोधले असता सगळ्यांनाच बसला ‘धक्का’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नातवाला घेऊन मळ्यात गेलेले आजोबा घरी परतले नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. त्या दोघांचा शोध घेतला असता ग्रामस्थांना आणि नातवेईकांना धक्का बसला. आजोबा आणि नातवाचा कठडा नसलेल्या विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार मनमाडच्या पानेवाडी येथे घडला. हरवलेले आजोबांचा बुधवारी (दि.4) गावाजवळील विहिरीत मृतदेह आढळून आला.

ग्रामस्थांनी विहीरीत नातवाचा शोध घेतला मात्र त्याचा शोध लागू शकला नाही. विहिरीत मोटारसायकल सापडल्याने हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भीमा सांगळे (वय-56) आणि वैभव सुनिल सांगळे (वय-3 दोघे रा. पानेवाडी) असे मृतांची नावे आहेत. भीमा सांगळे हे आपल्या तीन वर्षाच्या नातवाला घेऊन मंगळवारी मळ्यात गेले होते. मात्र ते घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरु झाला. त्यांच्याकडे मोटारसायकल असल्याने कदाचित ते नातेवाईकांकडे गेले असतील असा अंदाज घरच्यांना आला. मात्र, ते कोणत्याच नातेवाईकांकडे गेले नव्हते.

दरम्यान, त्यांचा शोध सुरु असताना गावाजवळील विहीरीत पाण्यावर तेलाचे तवंग दिसत असल्याने विहिरीत शोध घेतली असात भीमा सांगळे यांचा मृतदेह विहिरीत सापडला. तसेच दुचाकीही विहिरीत आढळून आली. मात्र, नातू वैभव याचा मृतदेह रात्री उशीरापर्य़ंत सापला नाही. दुचाकीवरून घरी येत असताना कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने भीमा सांगळे थेट विहिरीत पडले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.