आ. अशोक पवार यांची ग्रामीण आरोग्य रुग्णालयाला अचानक भेट

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर ग्रामीण आरोग्य रुग्णालयाला शिरुर हवेली चे आमदार अशोक पवार यांनी अचानक भेट देऊन रुग्णालयातील रुग्णांच्या होणाऱ्या गैर सोयी बाबत माहिती जाणून घेतली.

शिरुर हवेली चे आमदार अशोक पवार यांनी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार, जिल्हा राष्ट्रवादीचे संतोष भंडारी, खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश पाचर्णे, शहर राष्ट्रवादीचे मुज्जफर कुरैशी, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, रंजन झांबरे, कार्यकर्ते, व शहरातील पत्रकारांच्या उपस्थित रुग्णालयाची पाहणी केली.

अचानक शिरुर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांच्या रुग्णालयातील भेटीने उपस्थित कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला.

यावेळी उपस्थित कर्मचारी व डाॅक्टरांकडुन रुग्णालयातील अडचणी ची माहिती घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी दुरध्वनी वरुन चर्चा केली. व मतदार संघातील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने चर्चा करुन बैठक घेण्याचे सुचविले.

Visit : Policenama.com