आ. भारत भालके यांची प्रकृती स्थिर पण चिंताजनक; व्हेंटिलेटरवर ठेवल्याचं रूबी हॉलच्या डॉक्टरांनी सांगितलं

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूरचे (Solapur) राष्ट्रवादीचे ( NCP) आमदार भारत भालके ( Bharat Bhalke) यांना उपचारांसाठी रुबी हॉल (Ruby Hall Clinic) क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

रुबी हॉल क्लिनिकच्या बाहेर त्यांच्या प्रकृतीबद्दलचे पहिले मेडिकल बुलेटीन दुपारी साडेचार वाजता प्रसारित करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी रुबी हॉलमध्ये येऊन आमदार भालके पहिले व डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती घेतली. याच दरम्यान रूपालीताई चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यासह आदी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांची विचारपूस केली.

साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः डॉक्टरांनी बाहेर येऊन त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली. आमदार भारत भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार सुरू आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या बाहेर कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची प्रचंड गर्दी जमली आहे. पंढरपुरातूनही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते रुबी हॉलच्या बाहेर जमा झाले आहेत. प्रत्येक जण आमदार भारत भालके यांच्या निरामयतेची आणि त्यांच्या सुखरूप परतण्याची प्रार्थना करीत आहेत.