MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत (अण्णा) जाधव यांचे आज (गुरुवारी) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज आमदार चंद्रकांत जाधव ( MLA Chandrakant Jadhav) यांची प्राणज्योत मालवली.

 

आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार उद्योजक चंद्रकांत जाधवयांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर आणि समर्थकांवर शोककळा पसरली आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

चंद्रकांत जाधव यांनी सन 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

 

Web Title :- Kolhapur congress mla chandrakant jadhav passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा