‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले ‘हे’ आमदार शिवसेनेसोबतच !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिलेले नेवासा मतदारसंघातील शंकराव गडाख हे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज सोनईत योऊन त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेतली. त्यानंतर आ. शंकराव गडाख, प्रशांत गडाख हे मुंबईला जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेट घेतली व पाठिंब्याचे पत्र ठाकरे यांना दिले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले गडाख हे नेमके शिवसेनेसोबत का गेले असतील, याबाबत अनेकांकडून तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शंकराव गडाख यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी ते शिवसेनेसोबत गेले, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. गडाख यांच्या रूपाने नेवासा तालुक्याला मंत्रीपद मिळणार, असे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. गडाख हे नेमके शिवसेनेसोबत का गेले, याबाबत अनेक वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुळा एज्युकेशन सोसायटी संस्थेचे जागेवरून ते अडचणीत आले आहेत. आमदारकी पेक्षाही त्यांना संस्थेचे साम्राज्य टिकवणे महत्त्वाचे आहे. ते टिकवण्यासाठी त्यांनी सत्तेत राहणे आवश्यक आहे.

भाजपमध्ये गर्दी वाढलेली आहे. सेनेचे कमी आमदार निवडून आलेले असूनही सत्तेत त्यांचे महत्त्व वाढले आहे. आपल्याला सत्तेत वाटा मिळू शकतो. सत्तेसोबत राहिल्यास मुळा एज्युकेशन सोसायटीच्या जागेच्या अडचणीतून बाहेर येण्यास मदत होईल, असा गडाख कुटुंबियांचा कयास आहे. त्यामुळेच ते शिवसेनेसोबत गेले असावेत, असे सांगितले जात आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे शरद पवार यांच्या खूप जवळचे मानले जातात. विधानसभा निवडणूक त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र शंकराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी कामगार पक्षाच्या नावाने लढविली. राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. ते विजयी झाले. तरीही ते शिवसेनेत केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आज सकाळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे विमानाने शिर्डी येथे आले. शिर्डीतून सोनईत दाखल झाले. तेथे यांनी गडाख हे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर आमदार शंकराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख हे मुंबईला गेले. तेथे त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले.

Visit : Policenama.com