Video आ. राहुल कुल यांच्याकडून धनगर समाजाची फसवणूक : सक्षणा सलगर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – रासपचे आमदार राहुल कुल यांनी धनगर समाजाची निव्वळ फसवणूक केली असून त्यांनी २०१४ साली रासपच्या कडून उमेदवारी फक्त धनगर समाजाचे मतदान मिळविण्यासाठी घेतली होती मात्र त्यांनी धनगर समाजाचे कुठलेही काम केले नाही, त्यांचे नेते ज्यांना गुरू मानतात त्या पवारांचा नाद करणे खुळचट पणा आहे अशी टिका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केली.

त्या दौंड तालुक्यातील पाटस येथे महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला जी महिला आमच्या शहिदांच्या बाबतीत अशी विधाने करते ती साध्वी नसून भटक भवानी आहे असा घणाघात त्यांनी यावेळी केला.