MLA Sunil Tingre | सोलरमुळे विजेची बचत होऊन देशाच्या प्रगतीत हातभार लागेल – आमदार सुनील टिंगरे

आपल्या सोसायटीत आणि घरी सोलरचा वापर करुन समाजापुढे आदर्श निर्माण करावा महावितरणच्या वतीने पुणेकरांना आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sunil Tingre | सोलर सिस्टीम (Solar System) बसविल्यामुळे विज निर्मिति मधे हातभार लागुन देशाला विज खरेदी करण्यासाठी जो भार सहन करावा लागतो तो भार कमी होऊन विजेची बचत होईल आणि देशाच्या प्रगतीत आपला सहभाग होईल व हातभार लागेल असे मत सनसिटी सोसायटी व सुर्याटेक सोलर सिस्टीम यांच्या वतीने आयोजित ९० कीलोवॅट सोसायटी सोलर सिस्टीम उद्घाटन प्रसंगी वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केले .(MLA Sunil Tingre)

वडगाव शेरी येथील सन सिटी सोसायटी – ‘प्लेटिनम’ मधील चार इमारतींवर सुर्याटेक कंपणीच्या वतीने नव्वद कीलोवॅट सोलर सिस्टीम्स बसविण्यात आले. या सिस्टीम साठी बेचाळीस लाख ख़र्च करण्यात आला व ही सिस्टीम महावितरण ने कमीत कमी वेळेत मंजूरी देवून फक्त ४६ दिंवसात बसाविण्यात आली आहे. यामुळे सोसायटीचे ३६० युनिट प्रति दिन व १.७५ प्रती माह रूपयाची बचत होणार आहे. शिवाय सोसायटीच्या सामाईक भागातील लाइटला स्वस्तात वीज मिळणार आहे .या सोलर सिस्टीमचे उद्धघाटन आमदार टिंगरे व महावितरणचे अधिक्षक अभियंता डॅा. नीलेश रोहनकर यांच्या हस्ते करण्यात आले . या समयी

सामाजिक कार्यकर्ते नारायण गलांडे, सोसायटीचे अध्यक्ष दीप कुमार , सुर्याटेक चे महा संचालक मुकुंद कमलाकर सोसायटीचे सचिव दत्ता वागस्कर ,संचालक सचिन चौधरी,अक्षय अमोलिक यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या पीएम सूर्यधर योजना अंतर्गत सोलर सिस्टीम साठी मोठ्या स्वरूपात अनुदान देण्यात येते यामुळे शहरी भागात विज निर्मिती मोठया प्रमानावर होऊन देशाच्या विज निर्मितीमधे हातभर लागणार आहे. यामुळे मी यावेळी सर्व पुणे कारांनी योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन महावितरण अभियंता डॅा .निलेश रोहनकर यांनी केले .

सुर्याटेक संस्थेचे महासंचालक मुकुंद कमलाकार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात एक लाख ग्राहक आहेत.
सूर्याटेक कंपनीचे स्वतंत्र ॲप आहे त्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे .
ही सोलर सिस्टम चार बिल्डिंग वरती बसाविण्यात आली आहे प्रत्येकी १५ कीलोवॅट पैनल बसाविण्यात आले आहे
तसेच कॉमन मोटर साठी ३० कीलोवॅट संयंत्र बसाविण्यात आले आहे .
यामुळे रोज याठिकाणी तीनशेसाठ यूनिट पावने दोन लाख रुपये यामुळे बचत होणार आहे.
ही माहिती सुर्याटेक संस्थेचे संचालक सचिन चौधरी यांनी दिली.

कार्यक्रमासाठी उपस्थित पाहूण्याचे स्वागत सोसायटी अध्यक्ष दीप कुमार यांनी एक रोप देउन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मोनिका सरडा यांनी केले तर वागस्कार यांनी आभार मानले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्ह्यातील चार लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Nashik City Police | प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”

Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | बारमती मतदारसंघात 7 मे तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी होणार मतदान

IAS Rajendra Bhosale | सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार – नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले