खुशखबर ! मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये 5637 पदांवर मेगा भरती

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –   महाराष्ट्रातील तरुणांना मुंबई मेट्रो 3 च्या प्रकल्पासाठी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कुलाबा वांद्रे सिप्झ दरम्यान सुरू असणार्‍या मेट्रो 3 प्रकल्पासाठी मजुरांची गरज आहे. यासाठी कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या कामगारांची भरती करण्यात येणार असून मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येण्यात येत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे मेगाभरती करण्यात येणार आहे. याठिकाणी मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, अकुशल कामगार रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर अश्या विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण ५६३७ रिक्त जागांवर पात्र उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी आपण www.mmrcl.com या अधिकृत वेबसाईटवर अधिक मिळवू शकता.

यासोबतच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे संचालक, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर (कायदेशीर), सहायक महाव्यवस्थापक या पदांसाठी भरती अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ४ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२० आहे.

पदाचे नाव – संचालक, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर (कायदेशीर), सहायक महाव्यवस्थापक

नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज सुरु होण्याची तारीख – २२ जून २०२० आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०२० आहे.
अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com