MNS Chief Raj Thackeray | भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणावर राज ठाकरेंचा प्रश्न, इतक्या टोकाचं पाऊल का उचललं?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणावर (BJP MLA Ganpat Gaikwad Firing Case) भाष्य केले आहे. ठाकरे यांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले असून या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र, इतक्या दिवसानंतर ठाकरे यांना या प्रकरणावर बोलण्याची आवश्यकता का भासली, आणि त्यांचा रोख कोणाकडे आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.(MNS Chief Raj Thackeray)

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल पोलीस ठाण्यात घुसून कल्याण पूर्वचे शिवसेनेचे Shivsena (शिंदे गट – Shinde Group) शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. या गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते.

राज ठाकरे यांनी या गोळीबार प्रकरणावर म्हटले की, कल्याणमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेला राजकीय झालर आहे. मला असे वाटते की आमदार गणपत गायकवाडांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याच्या खोलात जायला हवे. एखादा माणूस इतक्या टोकाला का जाईल? एखादा माणूस पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार का करेल? हेदेखील तपासलं पाहिजे.

ठाकरे यांनी म्हटले की, कुठलीही व्यक्ती इथपर्यंतचा निर्णय का घेत असेल? त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल? असे पाऊल उचलण्याची परिस्थिती का उद्भवली असेल. हे प्रकरण इथपर्यंत कोणी आणले? याबाबतची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. न्यायालयात ती चौकशी होईलच.

घटनेनंतर काय म्हणाले होते गणपत गायकवाड…
ही घटना घडल्यानंतर गणपत गायकवाड यांनी फोनवरून एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत म्हटले होते की, महाराष्ट्रात ही गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे, हे माझे वैयक्तिक मत आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे. अशी माझी विनंती देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आहे.

गणपत गायकवाड म्हणाले, पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली. माझ्या जागेचा महेश गायकवाड यांनी ताबा घेतला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला गुन्हेगारांचे बनवत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील.

भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले, माझ्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवले. मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मी पाच गोळ्या झाडल्या, मला त्याचा काहीही पश्चात्ताप नाही. माझ्या मुलांना जर पोलीस ठाण्यात मारत असतील तर मग मी काय करणार? असा आरोप गायकवाड यांनी केला.

गायकवाड यांनी म्हटले की, पोलिसांनी मला पकडले म्हणून महेश गायकवाड वाचला. पोलिसांनी हस्तक्षेप केला, मी त्याला जीवे मारणार नव्हतो. पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचलले. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत. एकनाथ शिंदे दुसऱ्यांची आयुष्य खराब करत आहेत.

गणपत गायकवाड म्हणाले, मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली. माझा निधी वापरुन काम झाले की श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचे बोर्ड लावतात. दादागिरी करुन हे होते आहे. मी राज्य शासनाचा निधी आणला आणि कामे केली तिथे श्रीकांत शिंदेंनी त्यांची कामे म्हणून बोर्ड लावले.

मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना गणपत गायकवाड म्हणाले, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
एकनाथ शिंदे यांनी त्या भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले ते सांगावे. मी दहा वर्षांपूर्वी जागा घेतली होती. त्यांना पैसे दिले होते.
पण ते सही करायला येत नव्हते. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात केस जिंकलो. केस जिंकल्यावर सातबारा आमच्या नावे झाला.

मात्र महेश गायकवाड यांनी त्या जागेवर जबरदस्ती कब्जा केला. मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही कोर्टात जा,
जबरदस्ती कब्जा घेऊ नका. कोर्टाने ऑर्डर दिली तर आम्ही जागा देऊ. मात्र त्यांनी दादागिरी काही थांबवली नाही.

गोळीबाराच्या घटनेची माहिती देताना गणपत गायवाड म्हणाले, पोलीस स्टेशनच्या आवारात तो ५०० लोक घेऊन आला होता.
माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोळीबार केला.
मी एक व्यावसायिक आहे, माझ्या मुलांना कुणी गुन्हेगार मारत असतील तर मी काय करणार? माझ्या मुलाला कुणी मारले तर मी सहन करणार नाही.

गणपत गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजपाबरोबरही ते गद्दारी करणार आहेत.
माझ्याबरोबरही गद्दारीच केली. एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत.
एकनाथ शिंदे हे देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावे किती पैसे खाल्ले आहेत, किती बाकी आहेत.
कोर्ट निर्णय देईल तो मला मान्य असेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जेष्ठ नागरिकाची आत्महत्या, आंबेगाव येथील प्रकार

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार