MNS Raj Thackeray – Lok Sabha Elections | मनसेचं ‘एकला चलो रे’, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Raj Thackeray – Lok Sabha Elections | सर्व चर्चांना पूर्णविराम देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यातील सर्व ४८ जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सोमवारी ही माहिती दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी वरिष्ठ नेत्यांसमवेत सर्व लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतली. यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले. (MNS Raj Thackeray – Lok Sabha Elections)

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये मनसे नेते, सरचिटणीसांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आढावा बैठका सुरु आहेत. मतदारसंघातील एकंदरीत वातावरणाची माहिती राज ठाकरेंनी घेतली, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली. (MNS Raj Thackeray – Lok Sabha Elections)

सध्याचं महाराष्ट्रातील वातावरण मनसेसाठी पोषक असल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. युतीबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. स्वबळावर लढण्याच्या दृष्टीनेच आमची तयारी सुरु आहे, हे राज ठाकरेंनी वेळोवेळी सांगितलं आहे. त्यांनी स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद जाणून घेतली, ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठल्याही युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असंही नितीन सरदेसाई म्हणाले.

मनसेची ताकद वाढली

मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले, काही महत्वाच्या जागांच्या मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यात आली. त्यावेळी मतदारसंघात मनसेची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार करत मानसिक तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. एका नेत्याने सांगितले की, राज्यातील जनता राज ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहात आहे. पक्षाने शहरी आणि ग्रामीण भागात आपला पाया मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत.

राज ठाकरेंकडून चर्चांना पूर्णविराम

मागील काही वर्षांपासून मनसेने राजकीय भूमिकेबाबत सस्पेंस होता. कारण राज ठाकरे सत्ताधारी शिवसेना,
भाजप आणि इतर नेत्यांसोबत संपर्क साधत असल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान,
मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यासह विविध पक्षांचे नेते गणेशोत्सवादरम्यान गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या घरी गेले होते.
मात्र आता मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | आंदेकर टोळीतील बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर याच्यासह 14 जणांवर FIR, जाणून घ्या प्रकरण

ससून रुग्णालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस संशयाच्या पिंजऱ्यात;
महिला पीएसआयसह 7-8 पोलिस निलंबीत?

ACB Trap News | पतसंस्था मॅनेजरकडून लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Sr Police Officer Transfer | राज्य पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; बापु बांगर यांची पिंपरीत उपायुक्त म्हणुन बदली