‘त्या’ प्रकरणावरून ‘मनसे’कडून जितेंद्र आव्हाड यांची ‘पाठराखण’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच असताना दुसरीकडे मात्र, राजकीय द्वंद सुरू झाले आहे. एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. यापृकरणी मनसेकडून जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करण्यात आली आहे.
भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात असताना मनेसकडून मात्र जितेंद्र आव्हाड यांचे समर्थन करण्यात आले आहे.

मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू मांडताना विकृत पोस्ट केली म्हणून मारले असेल तर चांगले केले असे म्हटले आहे. अरे काहीही पोस्ट, कमेंट..काही करणार का. सोशल मीडिया आहे आपल्या विकृतीचे साधन नाही हो. चांगले घ्या की सोशलमधून. बरी विकृती करायला हात, मन धजावते कसे. मंत्री असो, सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी कमेंट विकृत करूच नये आणि केली तर विकृतीप्रमाणे मार खावा. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे. सोशल मीडियावर ही विकृती संपवली पाहिजे, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणार्‍या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ठाण्यातील एका व्यक्तीने आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही.

मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली. तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का?, अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.