कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सोमवारपासून मोबाईल पोस्टपेड सेवा सुरू होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मोबाईल सेवा अखेर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दुपारी 12 वाजेनंतर राज्यातील पोस्टपेड सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव रोहित कंसल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

याविषयी बोलताना रोहित कंसल यांनी म्हटले कि, लश्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून या ठिकाणी फोन आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे देशभरात असलेल्या नातेवाईकांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क साधता येत नव्हता. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like