न्यूमरॉलॉजी : तुमचा मोबाइल ‘नंबर’ काय ‘संकेत’ देतोय ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – गाडीचा नंबर असो, की मोबाईलचा, अनेकजण आपल्या आवडीनुसार तो घेत असतात. तर काही जण आपले लकी नंबर जास्तीत जास्त असलेला नंबर निवडतात. तर काहीजण शुभांक, भांग्यांक असलेले नंबर घेतात. यामुळे चांगले परिणाम दिसून येतात, असे त्यांचे म्हणणे असते. मोबाईल क्रमांक आपल्या भाग्याशी निगडित असल्याचे मानले जात असल्याने तो काळजीपूर्वक निवडला जातो. मोबाईल क्रमांक आणि आपले भाग्य याबाबत न्युमरॉलॉजी काय सांगते, यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत.

नाव आणि जन्मतारीखेवरून व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते, तसेच स्वभाव सुद्धा सांगितला जातो. अशाच प्रकारे आपला मोबाईल क्रमांकही अनेक गोष्टी सांगतो, तसेच अनेक बाबींवर परिणामकारक ठरतो. पारंपरिक कुंडलीप्रमाणेच अंक कुंडली मांडली जाते. पारंपरिक कुंडलीमधे 12 ग्रह, 12 राशी असतात. येथे 9 ग्रह, 9 घरे असतात. ती कुंडली पुढीलप्रमाणे असते.

अंक कुंडली :
अंक आणि त्यांचे ग्रह : 1 = रवी, 2 = चंद्र, 3 = गुरू, 4 = हर्षल/राहू, 5 = बुध, 6 = शुक्र, 7 = नेपच्यून/केतू, 8 = शनी, 9 = मंगळ. या अंक कुंडलीत तुमची जन्मतारीख अथवा मोबाइल क्रमांक कसा लिहायचा ते जाणून घेवूयात.

उदाहरणार्थ 8 जानेवारी 1976 ही जन्मतारिख असल्यास येथे 76 ची बेरीज 7 +6 = 13 तर तेरा या अंकाची फोड करून बेरीज येते 1 + 3 = 4, तसेच पूर्ण जन्म तारखेची बेरीज (8 + 1 + 1+ 9 + 7 + 6 = 32) येते. 32 ची फोड करून (3 + 2 = 5) बेरीज 5 येते.

मोबाइल क्रमांकाची कुंडली मांडताना त्याची बेरीज घेऊ नये. तसेच शून्य असल्यास, शून्याच्या आधीचाच नंबर पुन्हा घ्यावा. यात प्रत्येक अंकाच्या ग्रहावरून मोबाईल क्रमांक चांगला आहे अथवा कोणते फळ देणारा आहे, हे न्यूमरॉलॉजिस्ट सांगतात. करिअरसाठी क्रमांक कसा आहे, हे कुंडली मांडल्यानंतर समजू शकते. कोणत्या ग्रहांची युती आहे, कोणत्या ग्रहांचा विरोध आहे, ते पाहता येते. चतुर्थ दृष्टी, त्रिकोण असे अनेक प्रकार यामध्ये असतात. त्यातूनच कुंडली कशी आहे, याचा विचार केला जातो.

मोबाईल ही सध्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे असणारी वस्तू आहे. याद्वारे अनेक लोकांशी संपर्क साधला जातो. अनेक महत्वाची कामे मोबाईल फोनद्वारे केली जातात. एवढेच नव्हे तर अनेक लोक आपल्या व्यवसायासाठी मोबाईलचा सर्वाधिक वापर करतात. संगणकाप्रमाणे याचा वापर केला जातो. पैसा मिळवणे आणि मोबाईल यांचा निकटचा संबंध झाला आहे. म्हणून मोबाईल क्रमांकालादेखील न्युमरॉलॉजीच्या दृष्टीने खुप महत्व आहे. मोबाईल क्रमांकाच्या अंकांची सांगड घालून खूप गोष्टी लक्षात येतात. मोबाइलमधे जर काही अंक जोडीने येत असतील तर त्याचा प्रभावही वापरणार्‍यावर पडतो. अंकांच्या जोडीमुळे जीवनात अनेक घडामोडी घडतात.

अशी आहेत मोबाइल नंबर्सची वैशिष्ट्ये

1, 7, 8 अंक असणारी व्यक्ती सर्वांना मदतीचा हात देते. मात्र, तिच्या मदतीसाठी कुणी पुढे येत नाही. अशी व्यक्ती एकापेक्षा जास्त मार्गाने पैसे कमावू शकते.

3, 6, 2 अंक असल्यास विवाहानंतर भाग्योदय असतो. प्रवासाचे योग असतात.

3, 1, 7 अंक असल्यास जीवन संघर्षमय असते. कुटुंबात कुरबुरी जाणवतात.

3, 1, 9 असे अंक असल्यास उच्च शिक्षण होते. व्यक्ती साहसी असते. नोकरी, व्यवसायात यश मिळते.

2, 8, 4 या अंकांमुळे घरापासून अथवा जन्मठिकाणापासून लांब राहिल्याने फायदा होतो. पाणी आणि अग्नीपासून धोका असतो.

28 किंवा 82 – अंकांची अशी जोडी असल्यास पाण्यापासून सावध राहावे. शिक्षणात अडथळे येतात. वृत्ती अहंकारी असते.

24 किंवा 42 – अशी अंकांची जोडी असल्यास नकारात्मक विचार येतात. लवकर निराशा येते.

14 किंवा 41 – अशी अंकांची जोडी असल्यास शारीरिक कष्ट होतात. कर्ज न फिटल्याने ते सतत घ्यावे लागते.

97 किंवा 79 – अशी अंकांची जोडी असल्यास वडिलांपासून लांब राहिल्यास प्रगती होते.

75 – अंकाची ही जोडी असल्यास बोलण्यातून, लिखाणातून नावलौकिक मिळतो.

  •  मिसिंग नंबर्स म्हणजेच आपल्या मोबाईल क्रमांकामध्ये नसलेले क्रमांक होय. याचा कोणता परिणाम होतो ते जाणून घेवूयात.
  •  कमी नावलौकिक , सुखाची कमतरता, चिंता, कटकटी.
  •  कामात अडचणी, शिक्षणात अडथळे
  •  निर्णय घेण्यात अडचणी, भौतिक साधनांचा अभाव.
  • संघर्षमय जीवन, आत्मविश्वास अणि शौर्याची कमतरता.
  • इतरांचा सल्ला घ्याचा लागतो.
  • खूप मेहनत केल्यावर यश मिळते.
  • स्वत:च्याच विचारांमध्ये गुरफटलेले असतात.
  • बोलण्यात अडचणी, भावना नीट व्यक्त करता येत नाहीत.

हे लक्षात ठेवा

1 व्यवसाय आणि मोबाइल क्रमांकाची सांगड योग्य असेल, तर यशाचे शिखर गाठताना फार कसरत करावी लागत नाही.

2 मोबाईल क्रमांक आणि शिक्षणाचा निकटचा संबंध आहे. याचाही विचार करून क्रमांक निवडावा. यासाठी रोल नंबर आणि मोबाईल क्रमांकाची सांगड घातली जाते.

3 मोबाईल क्रमांक कुणाच्या नावावर आहे, याचा फरक पडत नाही. मात्र, कोण वापरतो हे महत्वाचे आहे.

4 मुलांना मोबाइल नंबर घेऊन देताना, पालकांनी योग्य ती काळजी घेतल्यास चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.

5 प्रत्येक अंकातून जी स्पंदने बाहेर पडतात, त्याचा जीवनावर खूप प्रभाव पडतो. ही स्पंदने जन्मतारखेशी, नावाशी मिळतीजुळती असतात, तशीच ती मोबाइल नंबरशीदेखील जुळली पाहिजेत.

6 बँक अकाऊंट नंबरसुद्धा योग्य त्या अंकांच्या युतीत असल्यास चांगली धनवृद्धी होते, आणि ती टिकते असे मानले जाते.

7 जुना मोबाईल नंबर अनुकुल नसेल तर त्याचा वापर कमी करून नवीन नंबर जास्तीत जास्त वापरा.

8 मोबाईल क्रमांक आणि आजारपण, यशाची हुलकावणी, कर्जफेड न होणे, अभ्यासात व्यत्यय, कटकटी, घर घेताना अडचणी, कर्तृत्व असूनही बेदखल, बढतीत अडचणी, परदेश प्रवासात अडथळे यांचा संबंध आहे, असे न्युमरॉलॉजिस्ट सांगतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/