मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात मदतनिधी जमा होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि मोठी बातमी हाती येत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. येत्या सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा( monday-farmers-will-start-getting-relief-fund) केले जातील, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay-wadettiwar-disclosed-information)यांनी दिली.

आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय झाल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. अतिृष्टीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी तयार करायचे आहे. त्यामुळे शेतक-यांना तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने दिलेल्या शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडतील हा शब्द आम्ही पाळत आहोत. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. आम्ही याबाबत राज्य निवडणूक आयोगाला देखील पत्र लिहून कळवले आहे. अशाप्रकारे पैसे वाटायचे असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असते. यापूर्वीही अशा परवानग्या मिळाल्या आहेत. जिथल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. तेथील निवडणूका नाहीत. त्यामुळे ती परवानगी नक्कीच मिळेल असे वडेट्टीवार म्हणाले.