‘शॉक’ लागून जखमी झाला ‘मुलगा’, छातीवर घेऊन हॉस्पीटलमध्ये पोहचली ‘माकडीण’, नंतर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्राण्यांना देखील संवेदना असते आणि शेवटी आई हि आई असते याचे जिवंत उदाहरण मध्यप्रदेशमध्ये पाहायला मिळाले. येथील सीहोर जिल्ह्यामध्ये एका माकडाने आपल्या पिल्लाला उपचारासाठी दवाखाण्यात आणले होते. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील एक माकडाचे पिल्लू विजेच्या तारेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले.

मात्र या पिल्लाच्या आईने त्याला उपचारासाठी थेट प्राण्यांच्या दवाखान्यात आणले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बसून ती आपल्या पिल्लावर उपचार करण्याचे सर्वांना आर्जव करत होती. मात्र तेथील नागरिकांना तिची दया आली नाही. मात्र त्या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांनी तिच्या पिलाची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे आढळून आले. त्यानंतर तिने आपल्या पिलाला घेत त्या ठिकाणाहून निघून जात आपल्या कळपात सामील झाली.

दरम्यान, तिच्या या वागण्याने माणसांना मोठा धडा शिकवला असून मानवाने प्राण्यांना देखील काळीज असते याची जाणीव ठेवण्याचे या दृश्यातून दिसून आले. त्यामुळे शेवटी आई हि आई असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Visit : Policenama.com