17 ते 20 ऑक्टोबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता, यंदा सरासरी पेक्षा 10 % अधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पावसाने सगळ्यांचीच झोप उडवली आहे. कारण नेहमीपेक्षा यावेळी पाऊस 15 दिवस जास्त थांबला आहे. सध्या 17 ऑक्टोबरला पुन्हा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुबंई, गोवा, कोकण या परिसरात 17 ते 20 ऑक्टोबरदरम्यान जोरदार पाऊस होणार आहे.

असा असतो मान्सूनचा हंगाम ? –
भारतीय हवामान विभागानुसार सर्वसामान्यपणे 45 दिवसांमध्ये मॉन्सून परत जातो. म्हणजेच भारताच्या उत्तरेकडील भागातून दक्षिणेकडे जाण्यासाठी मॉन्सून 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ घेतो. मात्र यावेळी मॉन्सूनने देशाच्या उत्तरेकडून 9 ओक्टोबरलाच परतीला सुरुवात केली होती. सर्वसाधारपणे मॉन्सून 45 दिवस देशामध्ये कार्यरत असतो.

या वर्षी किती दिवस जास्त थांबला मॉन्सून –
मॉन्सूनची सुरुवात जून महिन्यांमध्ये होते आणि 30 सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनला देशातून परतावे लागते. मात्र या वर्षी मॉन्सूनने जरा जास्तच मुक्काम केला आहे. अजून दोन दिवसानंतर मॉन्सून परतीच्या वाटेकडे जाणार आहे. मात्र जाता जाता जोरदार पाऊस होणार आहे. या वर्षी मॉन्सून चक्क पंधरा दिवस जास्त थांबला आहे. या आधी मॉन्सून 1961 मध्ये 1 ऑक्टोबरला परत गेला होता तर 2007 मध्ये 30 सप्टेंबरलाच परत गेला होता. पहिल्यांदाच मॉन्सून एवढा जास्त वेळ थांबला आहे.

यंदा 10 % अधिक झाला पाऊस –
या वर्षी संपूर्ण देशात 10 % पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागात जरी पावसाचे प्रमाण कमी असले तरी देशभरात एकूणच जास्त पाऊस पडला आहे. पूर्वेकडील हवामानात बदल झाल्यामुळे यंदा मॉन्सून अधिक काळ थांबला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी