सासरी पोहचण्यापुर्वीच नवरी बनली ‘विधवा’, पाठवणीनंतर नवर्‍यानं घेतली ‘फाशी’

नवी दिल्ली”  वृत्तसंस्था : बरेलीच्या नवाबगंजहून सोमवारी वरात आली. दिवसा धूम धडाक्यात लग्न साजरे झाले. संध्याकाळी नवरीच्या बिदाईनंतर घरी परत जात असताना गाडी एका ढाब्यावर थांबली आणि अचानक नवरदेव गायब झाला. शोध घेतल्यानंतर मंगळवारी पहाटे नवरदेवाचा मृतदेह जंगलातील झाडावर लटकलेला आढळला.

दुष्यंत गिरी (वय 22) हा मुरादाबाद येथील सैदांगली पोलिस स्टेशनच्या कुंढाली गावातील रहिवासी असून त्याचे बरेली जिल्ह्यातील नवाबगंजच्या कुटकापूर गावच्या ओमप्रकाश यांची मुलगी आशाशी लग्न झाले. दुष्यंत पेट्रोल पंपावर सेल्समन म्हणून काम करायचा. सोमवारी त्या दोघांचे धूम धडाक्यात लग्न झाले. विदाईनंतर दोघेही घरी चालले होते. गाडीत दुष्यंत, आशा, दोन फोटोग्राफर, दुष्यंतचा भाऊ, आणि नवरीसोबत एक मुलगी होती. सायंकाळी सातच्या सुमारास वधू-वरांची गाडी पाकबाड्यातील एका ढाब्यावर नाश्त्यासाठी थांबली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाश्त्यानंतर वधू गाडीत बसली. दरम्यान, ढाब्यावरून नवरदेव अचानक गायब झाला. कुटुंबीयांनी त्याचा बराच वेळ शोध घेतला पण काही कळू शकले नाही. व्यथित होऊन वधूला तिथून घरी पाठवण्यात आले. कुटुंब त्याचा शोध घेतच होते. मंगळवारी सकाळी नवरदेवाचा मृतदेह टीएमयूसमोर दोन किलोमीटर अंतरावर जंगलात झाडाला लटकलेला आढळला. कुटुंबीयांनी माहिती देत पोलिसांना बोलावले. दरम्यान, दुष्यंत गिरी याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती प्रभारी निरीक्षक सुरेंद्र सिंह यांनी दिली.

दारूची बॉटल आणि दोन ग्लास :
पोलिसांना ज्या ठिकाणी दुष्यंतचा मृतदेह सापडला, त्या ठिकाणी दारूची बॉटल आणि दोन ग्लास सापडले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे जमा केले. दारूच्या बाटल्या आणि ग्लास ताब्यात घेऊन बोटाचे प्रिंट घेण्यात आले आहेत. त्यांच्याशी जुळण्यासाठी दुष्यंतच्या काही नातलगांचे आणि संशयितांचे बोटांचे प्रिंटही घेतले जातील. खून आणि आत्महत्या या दोन्ही बाबींवरही पोलिस तपास करत आहेत.

दुष्यंतने आशाशी प्रेमविवाह केला होता. दुष्यंतचा मृत्यू आत्महत्या म्हणून स्वीकारण्यास हे कुटुंब तयार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी त्याला ठार मारून त्याच्या मृतदेह झाडावर टांगला. त्याचा प्रेमविवाह असल्याने पत्नीकडे कोणतीही तक्रार नव्हती. तो आनंदाने आपल्या बायकोला घेऊन आला होता. अशा परिस्थितीत त्याचे अचानक गायब होणे आणि त्याचा मृतदेह अश्या परिस्थिती सापडणे, ही गोष्ट मान्य करायला कोणीही तयार नाही.