Pune Pimpri Crime News | गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड परिसरातून अटक, गुन्हे शाखेकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | बेकायदेशिररित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) एकाला अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी (दि.2) देहुरोड येथील पारशी चाळीत केली.

पंकज संतोष चोथे (वय-23 रा. कचरा डेपो मागे, थेरगाव, वाकड) याच्यावर आर्म अॅक्ट (Arm Act) व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगीलवाड यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्याद दिली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते.
त्यावेळी पारशी चाळीतील एकाकडे गावठी बनावटीचे पिस्टल (Pistol) असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला असलेल्या कबुतर ढाबळ समोरून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता 50 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व 500 रुपये किमतीचे एक जीवंत काडतुस
जप्त करण्यात आले. पुढील तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धोत्रे (PSI Dhotre) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Maximizing Your Money: How Auto Sweep Facility Turns Savings Into Wealth

Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार