Pune Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Drug Mafia) रोज नवे खुलासे समोर येत आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (Sudhakar Sakharam Ingale) याला काही दिवसांपूर्वी अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्यानंतर आता येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) अटक केली आहे. (Pune Drug Case)

ललित पाटील हा अंमली पदार्थाच्या तस्करी (Drug Trafficking) प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) होता. त्यावेळी त्याने आजारी असल्याचा बहाणा केल्यानंतर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याने तेथून नाशिक येथे ड्रग्ज तयार करण्याच्या कारखान्यासह ड्रग्ज रॅकेट (Pune Drug Case) चालवल्याचे तपासात निष्पन्न झाले. ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काशिनाथ मरसाळे (वय-53) यांनी शिफारस केली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी त्यांना अटक केली आहे.

डॉ. संजय मरसाळे यांना बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) दाखल असलेल्या आयपीसी 223, 224,
225, 120(ब), 201, 34 मध्ये सोमवारी (दि.4) दुपारी साडेबारा वाजता अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोन चे (Unit-2) पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (PI Nandkumar Bidwai)
करत आहेत. डॉ. संजय मरसाळे यांनी आजपर्यंत कुणाकुणाला ससून रुग्णालयात दाखल होण्याचे शिफारस पत्र पाठवले
याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच त्यांना या मोबदल्यात किती पैसे घेतले, कसे व कोणत्या मार्गाने घेतले याचा
तपास गुन्हे शाखा करीत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Maximizing Your Money: How Auto Sweep Facility Turns Savings Into Wealth

Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार