MPSC परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. अभ्यास आणि तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडं केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक असणार आहे.

20 सप्टेंबर 2020 रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या नियोजित वेळेत बदल करण्यात आला असून ही परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 साठी घेण्यात येणारी परीक्षा 22 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाचं नवीन सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार आता 11 ऑक्टोबर, 22 नोव्हेंबर आणि 1 नोव्हेंबर रोजी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.