ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाकडून वारंवार होत होती. ठाकरे सरकारनं आता मोठा निर्णय घेत राज्य सेवा मंडळाच्या स्पर्धा परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली होती. येत्या 11 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार होती. परंतु आता कोरोनाचा धोका आहे. रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं होतं. म्हणून आता ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती. सरकारनं मराठा बांधवांची परीक्षा पाहू नये मराठा समजाच्या प्रश्नांवर तातडीनं तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी ठाकरे सरकाराला केलं होतं.