… म्हणून MS धोनीच्या प्लॅनिंगच्या पुढं रिकी पॉन्टींग देखील फिका : माईक हसी

पोलिसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा सलामीवीर मायकल हसीने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर स्तुतीसुमने उधळली आहे. त्याने रिकी पॉन्टींग आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या नेतृत्वाखाली आयपीएल स्पर्धा खेळली आहे. त्यानुसार दोघांच्या नेतृत्वशैलीबाबत हसीने धोनीच्या प्लॅनिंगपुढे पॉन्टींगही फिका असल्याचे म्हटले आहे.

धोनी अत्यंत शांत असून त्याच्या डोक्यात गणिते तयार असतात. धोनीच्या योजना रिकी पॉन्टींगपेक्षा अधिक सरस असतात. धोनीला सामन्याची समज चटकन येते. पॉन्टींगच्या योजनाही कामी येतात. पण धोनीच्या योजना अधिक प्रभावशाली ठरतात, कारण तो काही योजना आयत्या वेळी मैदानावर ठरवतो. अनेकदा आम्हाला वाटते की हे धोनी काय करतोय? पण अखेरीस त्याचा निर्णय बरोबर ठरतो. हे सारे कुठून येते? तो त्याच्या मनाची हाक ऐकतो. दोघे भिन्न स्वभावाचे कर्णधार आहेत, पण दोघे आपापल्या पद्धतीने प्रभावशाली आहेत, असे हसीने स्पष्ट केले. दुसरीकडे रिकी पॉन्टींग सगळ्या गोष्टींमध्ये स्पर्धा करत असतो. संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये टेबल टेनिस खेळत असो किंवा गोट्या खेळत असो, पॉन्टींगला सगळ्यात जिंकायचे असते. सराव सत्रात जर तुम्ही क्षेत्ररक्षणाचा सराव करत असाल, तरी त्याला सगळ्यात पुढे यायचे असते. कायम सर्वोत्तम कामगिरी करून त्याला इतरांसमोर आदर्श ठेवायचा असतो.