मुंबई – पुणे महामार्गावर अपघात ; २ ठार, २० जखमी

खालापूर : पोलिसनामा ऑनलाईन –  मुंबई – पुणे महामार्गावर खालापूरजवळ आज सकाळी मिनी बस आणि लक्झरीचा भीषण अपघातात झाला. या भीषण अपघातात २ जण ठार झाले असून २० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील मृत व्यक्ती हे वसईचे राहणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालापूरजवळ आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास मिनी बस आणि लक्झरीची धडक झाली. मिनी बस महाबळेश्वरकडे जात होती. बस बोगद्याजवळ आल्यानंतर लक्झरी बसवर आदळली. या अपघातात वसईचे रहिवासी जोसेफ सेरेजो आणि बसचालक शेखर कांबळे हे दोघे ठार झाले तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी वसईचे होते.

त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमीत फ्लॉरी जोसेफ सेरेजो , जोसेफ मनवेल सेरेजो, अलियन जोसेफ सेरेजो, आल्फिया जोसेफ सेरेजो, नॉबर्ट मनवेल सेरेजो, अर्षला सेरेजो, क्रिस्टल सेरेजो, सलाईन सेरेजो, मार्शल सेरेजो, फ्लॉरी परेरा, स्टॅनी परेरा, जॉयवेल सिल्वेटा, वंदना वर्तक, क्रुतांगी वर्तक, जयप्रकाश वर्तक, ब्रायन सिल्वेटा, प्रीती घोन्साल्विस, वैशाली डिमेलो, संजय डिमेलो यांचा समावेश आहे.

You might also like