‘मुंबई -भुवनेश्वर’ एक्सप्रेसची मालगाडीला धडक, 8 डबे घसरले 40 प्रवासी जखमी

कटक : वृत्त संस्था – दाट धुक्यामुळे मुंबई -भुवनेश्वर या कटक एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ८ डबे रुळावरुन घसरले आहे. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ४० जण जखमी झाले असून त्यातील ६ जणांची परिस्थिती गंभीर आहे.

ओडिशातील कटक निर्गुंडी रेल्वे स्टेशनच्या जवळ हा अपघात झाला आहे. मुंबई -भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेसने दाट धुक्यामुळे मालगाडीला धडक दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरुन घसरले आहेत. रेल्वे प्रशासनाने मदत कार्याला सुरुवात केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like