मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या

नेपाळ : वृत्तसंस्था

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची नेपाळच्या सुनसारी जिल्ह्यातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी खुशीदवर बेछूट गोळीबार केला. आरोपीची हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात नेपाळचा एक पोलीस हवालदारही जखमी झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d4430ee-be1c-11e8-b4a5-433d86effc94′]

खुशीद आलम याास गोळ्या झाडून हे हल्लेखोर मोटरसायकलवरून भारतीय हद्दीत पळून जात असताना येथे कर्तव्यावर असणाऱ्या हवालदाराने भारत-नेपाळ सीमेवर त्या दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना अडविणाऱ्या हवालदारालाही गोळ्या घातल्या. यामध्ये सदर हवालदार जखमी झाला आहे. या हल्ल्यासाठी वापरलेल्या दुचाकीची नंबरप्लेट भारतीय असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पोलिस पतीवर कॉन्स्टेबल पत्नीकडून बलात्काराचा आरोप

बाटला चकमकीतील फरार दहशतवादी शहजाद पप्पू याच्या अटकेनंतर आलमचे नाव समोर आले होते. खुर्शीद आलम हा आयएसआयसाठी काम करीत होता. इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी बाटला चकमकीनंतर फरार झाल्यानंतर खुर्शीदने पासपोर्ट तयार केला होता. तो आयएसआयचा हस्तकही होता. या हल्ल्याची दखल भारतातील तपास यंत्रणांनीही घेतली असून त्यादृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

[amazon_link asins=’B077TVWFLB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e27fdb7-be1c-11e8-a294-9f656ddb6c38′]