Mumbai Crime | तलवार उगारणं पडल महागात, महाविकास आघाडीच्या महिला मंत्र्यासह तिघांवर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | भाजप नेते महित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांच्या तक्रारीवरुन महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन नेत्यांवर वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad), मंत्री अस्लम शेख (Minister Aslam Sheikh) तसेच प्रतापगढी (Pratapgadhi) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि शास्त्रस्त्र कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा (Mumbai Crime) दिला आहे.

 

 

एका जाहीर कार्यक्रमात मंत्री अस्लम शेख, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि प्रतापगढी  यांनी हातात तलवार घेतल्या होत्या. त्यांच्या या कार्यक्रमाचा फोटो कंबोज यांनी ट्विट करत या मंत्र्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. आता कंबोज यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.(Mumbai Crime)

 

 

या कार्यक्रमानंतर कंबोज यांनी आरोप केला असता हा शीख समाजाचा (Sikh Community) कार्यक्रम होता. त्यांनी तलवार दिली, मोदी यांना पण तलवार दिली आहे. तलवार घेऊन आम्ही लोकांमध्ये नाचलो नाही. दोन्ही कार्यक्रमात फरक आहे असं काँग्रेस (Congress) नेते अस्लम शेख यांनी सांगितले.

 

 

दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांनी 27 मार्च रोजी दोन्ही मंत्र्यांचे तलवारीसह फोटो ट्विट केले होते
आणि काही दिवसांपूर्वी तलवार फिरवल्याबद्दल मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Web Title :- Mumbai Crime | swordsmanship is expensive crimes against aslam shaikh varsha gaikwad and imran pratapgadhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Allu Arjun Viral News | सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनवर झाली पोलिसांकडून मोठी कारवाई, गाडीमध्ये सापडली..

 

Post Office MIS Account | दरमहा कमाई पाहिजे तर ‘या’ खात्यात 1 हजार जमा करा

 

Not Receiving Aadhaar OTP | आधार कार्ड मोबाईल क्रमांकसोबत लिंक करुनही OTP येत नाही? मग ‘हे’ करा काम, जाणून घ्या