Pune News : मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  डबेवाल्यांना मोफत मोपेड गाडी देण्याच्या प्रकरणात सुभाष तळेकर (Subhash Talekar)यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ते मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर पोलिसांकडून सुभाष तळेकरांना (Subhash Talekar) अटक केली आहे.

ही घटना २०१५ ला घडली आहे. मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत मोपेड गाडी देण्याच्या आश्वासनाने ६१ डबेवाल्यांच्या वेगवेगळ्या कागपत्रांवर सह्या घेतल्या. या सह्यांच्या वापर करून भैरवनाथ पथसंस्थेकडून डबेवाल्यांच्या नावाने वाहन कर्ज घेऊन एक रक्कमी धनादेश डीलरकडे सुपूर्त केला. त्यामुळे याप्रकरणात घोटाळा करत फक्त १५ डबेवाल्यांना TVS loona मोपेड गाडी देण्यात आली. २३ डबेवाल्यांना गाड्यांची नोंदणी न करता (passing) गाड्या दिल्या आणि उर्वरित डबेवाल्यांना गाड्या दिल्या नाही. मात्र त्यांच्या नावे कर्ज लादले गेले. गाडी न मिळाल्यामुळे डबेवाल्यांनी आशा सोडली होती. पण, अचानक २०१९ ला कर्ज परतफेड न केल्या संदर्भात मालमत्ता जप्तीच्या नोटीसा डबेवाल्यांना भैरवनाथ पथसंस्थेकडून पाठवण्यात आल्या.

या प्रकरणासंबंधित सुभाष तळेकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या संबंधित विठ्ठल सावंत हे फरार झाले. पोलिसांमार्फत त्यांचा शोध घेत आहेत.आपली फसवणूक झाल्याची कळता डबेवाल्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. डबेवाल्यांनी एकत्रित येत तळेकर आणि आणखी चार जणांविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ४२० अन्वये एफआयआर करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.