Mumbai Indians | मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बारामतीच्या ‘या’ दोन खेळाडूंची निवड

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती (Baramati) येथील धीरज जाधव क्रिकेट अकादमीच्या (Dheeraj Jadhav Cricket Academy) सुजित उबाळे (Sujit Ubale) व स्वराज वाबळे (Swaraj Wabale) दोन खेळाडूंना मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाच्या निवड चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे. मुंबईतील (Mumbai Indians) रिलायन्स स्टेडीयमवर (Reliance Stadium) शनिवारी आणि रविवारी ही निवड चाचणी होणार आहे. बारामतीच्या या दोन खेळाडूंचे भवितव्य शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या निवड चाचणीतील प्रदर्शनावर अवलंबून असणार आहे.

 

धीरज जाधव क्रिकेट अकादमीचे प्रमुख धीरज जाधव (Dheeraj Jadhav) यांनी याबाबत माहिती दिली आहे. सुजित उबाळे व स्वराज वाबळे हे दोघे बारामतीचे उदयोन्मुख खेळाडू आहेत. आयपीएल मध्ये प्रत्येक टीमला नव्या होतकरु क्रिकेटपटूंची गरज असते. विशेषतः ऑलराऊंडर्सची जास्त आवश्यकता असते. दरम्यान सुजित उबाळे याची या पूर्वी महाराष्ट्र् टी 20 स्पर्धेसाठी निवड झाली होती तर स्वराज वाबळे याची 23 वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघात संभाव्य खेळाडू म्हणून निवड झाली होती. (Mumbai Indians)

याबरोबर धीरज जाधव क्रिकेट अकादमीचा खेळाडू राहुल देशमुख याची पॉंडिचेरीच्या (Pondicherry) संघात आगामी बीसीसीआयच्या (BCCI) स्पर्धांसाठी शिबीर सरावासाठी निवड झाली आहे. राहुल देशमुख (Rahul Deshmukh) लवकरच या शिबीरासाठी पॉंडेचरीला रवाना होणार असल्याची माहिती क्रिकेट अकादमीचे प्रमुख धीरज जाधव यांनी दिली आहे. बारामतीतून आयपीएलच्या (IPL) निवडचाचणीपर्यंत पोहोचणारे सुजित उबाळे व स्वराज वाबळे हे पहिलेच खेळाडू ठरले आहेत. त्यांची निवड जरी झाली नसली तरी ग्रामीण भागातून या टप्प्यापर्यंत गेलेले ते पहिलेच क्रिकेटपटू आहेत.

 

Web Title :- Mumbai Indians | two baramati cricketers selection process for mumbai indians ipl marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Constitution Day | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ ऐतिहासिक वारसा मुरबाड भूमीत भारतीय संविधानाचा 72 वा वर्धापन दिन साजरा

Balika Vadhu-2 | नऊ वर्षांनी पुढे गेली बालिका वधूची कहाणी; शिवांगी जोशी, समृद्ध आणि रणदीपची धमाकेदार एन्ट्री

Earwax Cleaning Tricks | कानातील मळ काढण्याची ‘ही’ पद्धत अतिशय धोकादायक, सावध व्हा ! अन्यथा फाटू शकतो कानाचा पडदा

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 852 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचे खरे कारण आले समोर, जाणून घ्या