मुख्यमंत्री शिवसेनेचाच, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं केलं ‘फायनल’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून या साऱ्या घडामोडींकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आजदेखील आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याविषयी महत्वाचे भाष्य केले आहे.

सत्तास्थापनेच्या प्रश्नावर बोलताना नवाब मलिक म्हणाले कि, राज्यात महाशिवआघाडीचे सरकार आले आणि त्यामध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे गेल्यास आम्हा दोघा पक्षांना काहीही अडचण नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून भाजपशी बोलणी फिस्कटल्याने शिवसेनेने आघडीतील पक्षांशी सत्तास्थापनेचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या तिन्ही पक्षांनी मिळून सत्तास्थापनेचा निर्णय घेतला असून तिन्ही पक्ष एकत्र येऊन किमान समान कार्यक्रम निश्चित करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा भाजपवर टीका केली असून मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचा पुनरुच्चार देखील केला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like