राईचा पर्वत नव्हे राईने उपचार करा, जाणून घ्या 10 जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय मसाल्यांमध्ये सर्वात चिमुकला मसाला राई म्हणजेच मोहरी होय. याचा समावेश सरसोमध्ये होतो. याचा दाणा छोटा आणि काळा असतो. याबाबत एक वाकप्रचार आहे की, राईचा पहाड करू नये, म्हणजे छोट्या गोष्टीवरून उगाचच मोठा गोंधळ घालू नये…या लहानशा दाण्यात आरोग्याची अनेक रहस्य दडलेली आहेत. जाणून घेवूयात याचे 10 गुण…

1) पाचकता हा मोहरीचा प्रमुख गुण आहे.

2) पोटातील जंत याचे पाणी प्यायल्याने मरतात.

3) कॉलरा म्हणजे पटकीसारख्या आजारात मोहरी वाटून त्याचा पोटावर लेप लावल्याने पोटातील कळ आणि मुरड यापासून आराम मिळतो.

4) याची पोटली बनवून वेदना होत असलेल्या भागावर शेकल्यास ताबडतोब आराम मिळतो.

5) मोहरीचा लेप लावल्यास सूज कमी होते.

6) गरम पाण्यात मोहरी टाकल्याने ती फुलते. तिचे गुण पाण्यात उतरतात. हे पाणी कोमट पाण्यात टाकून टबात कमरेपर्यंत पाणी येईल असे बसावे, यामुळे लैंगिक आजार, गरमी, इत्यादी आजारात आराम मिळतो.

7) मोहरी मधात वाटून मिसळावी आणि त्याचा वास घ्यावा. यामुळे सर्दी लवकर बरी होऊ शकते.

8) मिरगी-बेशुद्ध पडणे या समस्येत मोहरी वाटून तिचा वास घेतल्यास फायदा होतो.

9) मोहरीच्या तेलात बारीक मीठ मिसळून दात घासल्याने पायरिया रोग नष्ट होतो.

10) मोहरीच्या दाण्याने नजरदेखील काढली जाते, परंतु ही अंधश्रद्धा सोडली आणि मोहरीचे दाणे कायम जवळ ठेवल्यास अनेक आजारावर ते उपयोगी ठरू शकतात.