ताज्या बातम्या

Maharashtra Rains | पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसणार, मराठवाड्याला ‘अवकाळी’चा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्यात अवकाळी पावसाने (Maharashtra Rains) विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा एकदा आगमनाच्या तयारीत आहे. अरबी समुद्र (Arabian Sea) आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी (Tamil Nadu coast) परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area) राज्यात पावसासाठी (Maharashtra Rains) पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर पासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD ने मराठवाडा (Marathwada), कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्रातील (Central Maharashtra) अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

 

30 नोव्हेंबर रोजी 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट

 

हवामान खात्याने मंगळवारी (दि. 30) मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 16 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ (yellow alert) जारी केला आहे.
या 16 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह (Thunderstorm) वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची (Heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.
त्यामुळे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

1 व 2 डिसेंबरला पावसाचा जोर वाढणार

 

त्यानंतर 1 आणि 2 डिसेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
या दोन्ही दिवशी हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी
जोरदार पावसाची शक्यता (Maharashtra Rains) वर्तवली आहे.
आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असताना, अस्मानी संकटानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

 

उद्या 14 जिल्ह्यात पाऊस

 

उद्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर,
औरंगाबाद आणि अहमदनगर या 14 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्याने संबंधित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | heavy rainfall with gusty wind in mumbai and pune imd give alert to marathwada also Yellow alert to 16 districts namely Mumbai, Thane, Palghar, Nashik, Nandurbar, Dhule, Aurangabad, Ahmednagar, Osmanabad, Latur, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Kolhapur, Sangli and Satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 67 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Multibagger Stocks | ‘या’ स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, 11 वर्षात एक लाखाचे झाले 1 कोटी

Pooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल मीडियावर लावली आग (PHOTOS) 

Back to top button