MVA Vajramuth Sabha | ‘… त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? दातखीळ बसली होती का?’, अजित पवारांचा सरकारवर घणाघात (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – MVA Vajramuth Sabha | काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्यावर वक्तव्य केल्याने त्याच्या प्रत्युत्तरात शिवसेना (Shisvena) शिंदे गट-भाजपने (BJP) ‘सावरकर गौरव यात्रा’ (Savarkar Gaurav Yatra) राज्यभर आयोजित केली आहे. या यात्रेवरून अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला आहे. ‘तुमच्या नेते, आमदारांकडून महापुरुषांचा अवमान केला गेला. त्यावेळी गौरव यात्रा का काढल्या नाही?, त्यावेळी दातखीळ बसली होती का? असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिंदे गटाला केला. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेत (MVA Vajramuth Sabha) बोलत होते.

 

 

अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी (Marathwada Liberation Day) मुख्यमंत्री 13 मिनिटे देतात. एवढी उपेक्षा आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने केली नसेल. तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Phule) यांचा अपमान केला. त्यावेळी दातखीळ बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फक्त व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची आहे का हिंमत? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.

यांचा पायगुण चांगला नाही
राज्यात उद्योग येणार होते, पण यांचा पायगुण चांगला नाही उद्योग सगळे निघून गेले. 75 हजार नोकर भरती होणार होते किती लोकांना नोकरी दिली? कांदा अनुदान जाहीर केले पण घातल्या. जाती धर्मात भेदभाव केला जात आहे. आज गौरव यात्रा काढता, तुमच्यात धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. महागाई, बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी घटना घडत आहेत. महाविकास आघाडीची सभा (MVA Vajramuth Sabha) होऊ नये म्हणून घटना घडल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

 

तर देशातील राज्यांत स्थिरता राहणार नाही
राज्यातील सरकार पाडण्याचे काम त्यांनी केले. हे असेच घडत राहिले, तर देशातल्या प्रत्येक राज्यात स्थिरता राहणार नाही.
आशामुळे उद्योगधंदे येणार नाही. यातून लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार होणार नाही.
प्रशासनालाही कोण कधी येईल, कोण कधी जाईल, याचा विश्वास नसेल तर प्रशासन चांगल्या पद्धतीने चालणार नाही.
ज्याप्रकारचे एक गट बाजुला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. अशाप्रकारे निर्णय दिला तर पुढे काय होणार.
सुप्रीम कोर्टात हा निर्णय बाकी आहे. आमचा कोर्टावर विश्वास असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

Web Title :-  MVA Vajramut Sabha | ‘… Why didn’t Gaurav Yatra take place at that time? Was there a toothache?’, Ajit Pawar’s attack on the government (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MVA Vajramuth Sabha | ‘मविआ’च्या सभेला ‘हा’ बडा नेता राहणार गैरहजर, कारणही आलं समोर

Subhash Desai | मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले-‘त्याचं राजकीय अस्तित्व…’

CM Eknath Shinde | ‘…त्यांना जागा दाखवण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला (व्हिडिओ)