‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य करा’ : आ. प्रतिभा धानोरकर यांचे आवाहन

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन –   माझे कुटुंब,माझी जबाबदारी या राज्यशासनाच्या मोहिमेबद्दल सर्वत्र गैरसमज निर्माण झाल्यामुळे विशेषता ग्रामीण भागात या मोहिमेला विरोध होत आहे. मात्र ही मोहीम सर्व सामान्य माणसाच्या आरोग्याच्या हितासाठी असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन भद्रावती-वरोरा विधानसभा निर्वाचन क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी नागरिकांना केले आहे.

भद्रावती नगर परिषद सभागृहात दि.01 अक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात आलेल्या बैठकित आ. प्रतिभा धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे ,वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद किन्नाके ,नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
या सभेत सदर मोहीमेंबद्दल पसरलेल्या अफवांचे निराकरण करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत नागरिकांच्या शरीरातील तापमान,आक्सिजन आदींची नोंद घेतली जाते. गंभीर बाब असलेल्या रुग्णांना केवळ उपचारासाठी दाखल करण्यात येते. अशी माहिती देण्यात आली. सभेत उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले.