खळबळजनक ! तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षक व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक भिंगारे, जांभळे व इतर कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सुमारे दोन-अडीच वर्षापूर्वी नेवासा पोलीस ठाण्यात एका संशयिताचा मृत्यू झाला होता. फाशी घेऊन आरोपीचा मृत्यू झाला, असा पोलिसांनी बचाव केला होता. दुसरीकडे मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या मृत्यू प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात आली होती. मात्र त्यात पोलिसांना ‘क्लिनचिट’ मिळाली होती.

याप्रकरणी मयतांच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने तत्कालीन पोलिस निरीक्षक लोखंडे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशाविरुद्ध लोखंडे व इतर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे आज सायंकाळी नेवासा पोलीस ठाण्यात मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक लोखंडे व इतरांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी अशा सुमारे दहा जणांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –