धक्कादायक ! अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ

नागपूर (Nagpur Crime) : पोलीसनामा ऑनलाइन – एका 15 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये (Nagpur Crime) उघडकीस आली आहे. नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये गुरुवारी (दि. 10) सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राज पांडे (वय 15) असे मृत मुलाचे नाव आहे. तर सूरज शाहू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे समजते. आरोपी सुरजने गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास राज याचे अपहरण केले होते. खंडणी म्हणून आरोपीने शोषण करणाऱ्या मृत राज याच्या काकांच्या मुंडक्याची धक्कादायक मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे देखील वाचा

महंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचे कारण, प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा’

‘मूग डाळीचे पाणी’ शरीरासाठी खूपच उपयोगी , जाणून घ्या फायदे

Video : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर ‘हे’ पदार्थ नक्‍की खा

रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका ! दुसऱ्या बँकेच्या एटीममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जादा शुल्क

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Nagpur Crime | 15 year old boy kidnapped and murdered accused arrested in nagpur